दापोलीत भाजप-सेना सरकार अपयशी सुप्रिया सुळेंचा आक्रोश मोर्चा-‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:47 IST2017-11-16T23:46:56+5:302017-11-16T23:47:28+5:30

दापोली : राज्यात दररोज शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत.

BJP-Sena government fails Supriya Sule's 'Aaksha Morcha' | दापोलीत भाजप-सेना सरकार अपयशी सुप्रिया सुळेंचा आक्रोश मोर्चा-‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’

दापोलीत भाजप-सेना सरकार अपयशी सुप्रिया सुळेंचा आक्रोश मोर्चा-‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’

दापोली : राज्यात दररोज शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत. माता भगिनींची अब्रू दिवसाढवळ्या लुटली जात आहे. नागरिक सुरक्षित नाही. सरकार मात्र ‘मी लाभार्थी’च्या खोट्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये उधळत आहे. सर्व आघाड्यांवर हे सरकार अपयशी असून, अशा सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे. भाजप-सेनेच्या अपयशी सरकारने ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’, असा आक्रोश खासदार सुप्रिया सुळे यांनी दापोलीतील मोर्चात केला.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दापोली तालुक्यात केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री भास्कर जाधव, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, रत्नागिरी जिल्हा ग्रामीण बँकेचे संचालक बाबाजी जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बिरवटकर, दापोली पंचायत समिती सभापती चंद्रकात बैकर सहभागी झाले होते.

आता का नाही विकास?
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना सरकारवर ऊठसूट टीका करायचे. आता ते मुख्यमंत्री आहेत. मग जनतेला अभिप्रेत विकास का होत नाही, असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी केला.

Web Title: BJP-Sena government fails Supriya Sule's 'Aaksha Morcha'